Your Own Digital Platform

वेण्नानगर येथे रक्षाबंधन उत्साहात


सातारा : जि. प. वेण्नानगर शालेत रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी एकमेकांचे रक्षण करावे असे विचार सौ. वैशाली वीर यांनी उदाहरणे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी शाळेतील मुलींनी मुलांना राख्या बांधल्या. या कार्यक्रमास ग्रामशिक्षण समितिचे पदाधिकारी, सदस्य, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यी उपस्थित होते. प्रणीता गायकवाड यानी आभार मानले.