Your Own Digital Platform

खांब एकीकडे, ऊजेड भलतीकडे


लोणंद : नगरपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. लोणंद निरा रस्त्यावर अहिल्यादेवी होळकर चौकाजवळ असलेल्या पथदिव्याचा प्रकाश चक्क खाजगी हॉस्पिटलच्या दिशेने वळवल्याचा प्रकार उजेडात आलेला आहे.

 एकीकडे जिथं गरज आहे तिथं लाईटची सोय न करता नागरिकांच्या सोयीसाठी असलेली लाईट दुसरीकडे वळवली असल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे नगरपंचायत नक्की कोणासाठी काम करतेय, सामान्य नागरिक की धनदांडगे यांच्यासाठी? असा सवाल लोणंदच्या नागरिकांना पडला आहे.