केबीपी कॉलेजने पन्नास टक्के फी परत न केल्यास ठिय्या आंदोलन


सातारा : शासनाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना फी मध्ये दिलेली पन्नास टक्के सवलत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांनी प्राचार्य सांगळे यांना धारेवर धरले. दोन दिवसात विद्यार्थ्यांची स्विकारलेली फी पैकी निम्मी रक्कम परत न केल्यास कॉलेजवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.

शासनाने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये पन्नास टक्के सवलत दिली. संपूर्ण फी आकारण्याऱ्या कॉलेजवर कारवाई करण्याचा इशारा देवूनही के. बी. पी कॉलेजमध्ये इंजिनिअरींगची संपूर्ण फी घेतल्या शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. अशी भूमिका घेतली होती. या प्रश्‍नावर कर्मचारी जाणीवपुर्वक मरठा समाजातील मुलांना टार्गेट करत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी समन्वयकांकडे केल्या. या गंभीर बाबींची दखल घेवून जयेंद्र चव्हाण, शरद काटकर, प्रशांत नलवडे, शदर जाधव, निंबाळकर, संदिप पोळ यांनी के.बी.पी कॉलेजचे प्राचार्य सांगळे यांच्याकडे बैठक घेवून विद्यार्थ्यांच्या फीच्या प्रश्‍नासह अन्य विषयांचा जाब विचारला. सुरवातीला प्राचार्य सांगळे यांनी उडवा उडवीची उत्तरे देवून अशा प्रकारे कोणतीही फी स्विकारली घेतली नसल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी प्राचार्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केल्यावर प्राचार्यांची बोलतीच बंद झाली.

दोन दिवसात विद्यार्थ्यांचे फी परत न झाल्यास कॉलेजवर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन करून ठिय्या मारला जाईल असा इशारा देताच फी परत करण्याची भूमिका प्राचार्य सांगळे यांनी घेतली. मराठा विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांनी टार्गेट करू नये अशी भूमिका मांडली. याबाबतचे लेखी आश्‍वासन प्राचार्य सांगळे यांनी मराठा समन्वयकांना दिले.

सातारा : पन्नास टक्के फी परत देण्याचे लेखी आश्‍वासन प्राचार्य सांगळे यांच्याकडून घेताना मराठा समन्वयक पदाधिकारी.

No comments

Powered by Blogger.