Your Own Digital Platform

देशभक्‍तीपर समूह गीत स्पर्धेचा उपक्रम प्रेरणादायी : सुभाषराव जोशी


कराड : कराड अर्बन स्पोर्टस क्‍लबने आयोजित केलेल्या देशभक्‍तीपर समूह गीत स्पर्धेमुळे समाजात देशभक्‍तीचा जागर होत असून या स्तुत्य उपक्रमातून गायकांना प्रेरणा मिळेल असे उद्‌गार अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी काढले.

यावेळी पुढे बोलताना बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत व्हावी यासाठी विविध गटामध्ये देशभक्‍तीपर गीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले ही कौतुकास्पद बाब असून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सुरू केलेल्या या उपक्रमात विविध संघाने सहभागी होणे गरजेचे आहे.

कराड अर्बन स्पोर्टस क्‍लबच्या वतीने देशभक्‍तीपर समूह गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : 15 वर्षाखालील गट प्रथम क्रमांक-संत तुकाराम हायस्कूल, कराड, द्वितीय क्रमांक-ज्ञानसंवर्धिनी हायस्कूल, कराड, तृतीय क्रमांक-कराड नगरपालिका शाळा नं. 9, उत्तेजनार्थ-सुंदराबाई दगडे हायस्कूल, सांगली, एस.एम.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल,कराड, 15 वर्षावरील गट प्रथम क्रमांक-मातोश्री बयाबाई श्रीपतराव विद्यालय, द्वितीय क्रमांक-म्युझीक वॉरीअर्स, कराड, तृतीय क्रमांक-एस.एम.एस. ग्रुप, कराड, उत्तेजनार्थ-ज्ञानसंवंर्धिनी उच्च माध्यमिक विद्यालय, शिरवळ, रिदम म्युझिक ऍकॅडमी व स्वरमिलाप, कराड या स्पर्धेसाठी सातारा, सांगली, कडेगाव, शिरवळ तसेच कराड व कराड परिसरातील विविध शाळा महाविद्यालयातील एकूण 23 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी रक्कम रू. 5000, ट्रॉफी, द्वितीय क्रमांकासाठी रक्कम रू. 3000 व ट्रॉफी, तृतीय क्रमांकासाठी रक्कम रू. 2000 व ट्रॉफी, उत्तेजनार्थ साठी प्रत्येकी रू.500 तसेच प्रत्येक सहभागी झालेल्या स्पर्धकांना सन्मानपत्र असे पारितोषकाचे स्वरूप होते. या स्पर्धेसाठी सौ. रोहिणी भिंताडे व मोहन सासवडे यांनी परिक्षक म्हणून कामकाज पाहिले.
या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी दिलीप चिंचकर, सुहास पवार, विकास खबाले, जगदीश त्रिवेदी, वैभव सपकाळ, शिरीष देसाई, श्रीपाद पालकर, महेश ढवळे, गजानन कुलकर्णी, आशिष जोशी, दिनेश शिंदे, मितेश जोशी, वैशाली पवार, रामेश्‍वरी पंडीत, प्रांजली ठोंबरे, किरण थोरात यांनी प्रयत्न केले.