आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

म्हसवडमध्ये दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद
म्हसवड : म्हसवडमध्ये दरोडा टाकायला आलेली सांगली जिल्ह्यातील टोळी पोलिसांनी जेरबंद केली. त्यांच्याकडून धारदार शस्त्रासह स्क्रू ड्रायव्हर, कात्री असे साहित्य हस्तगत करण्यात आले.

म्हसवड पोलिसांकडून रविवारी रात्रगस्त सुरु असताना येथील स्टेट बॅंकेच्या पुढे दुचाकी (एमएच 10 सीई 4408) वरील दोघे संशयास्पदरित्या वावरत असल्याने पोलिसांनी त्यांना हटकले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर अन्य साथीदार असल्याचे समजले. त्यानंतर येथील सातारा-पंढरपूर रस्त्यावर चांदणी चौकात सिल्व्हर रंगाची स्विप्ट डिझायर (एमएच 12 एफझेड 392) गाडी रात्री तीनच्या सुमारास संशयितरित्या आढळून आली. संबंधित गाडीची तपासणी करण्यात आली. 

यावेळी एक स्क्रु डायव्हर, एक कात्री, एक चाकू, एक लोखंडी टॉंमी, एक लाडकी दांडके मिळून आले. गाडीतील राहूल आप्पासो गडदे वय 22 रा. सिद्धेवाडी, ता. मिरज, सौरभ दादासो खोत वय 20 रा.वाघमोडे नगर कुपवाड मिरज, राहूल राजू शिंदे वय 19 रा.आंबा चौक कुपवाड मिरज, अक्षय दादा सरग रा. अजिंक्‍यनगर कुपवाड, आण्णासाहेब बाळासो मदने वय 21 रा. मदने मळा करंजे ता. खानापूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल राहूल मदने यांनी दिली असून तपास सपोनि मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर यादव करीत आहेत.