गर्भपात औषध विक्रीतील मूळ सूत्रधाराला अटक करा


सातारा : सातारा जिल्ह्यात 897 गर्भपात करून घेणारी जोडपी गर्भलिंग निदान करणारे डॉक्‍टर यांच्यासह प्रलंबित गर्भपात औषध विक्री प्रकरणाच्या मूळ सूत्रधाराला अटक करण्याची मागणी ऍड. वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

देशपांडे पुढे म्हणाल्या जिल्ह्याच्या अकरा तालुक्‍यातील शेकड यांनी नेमलेल्या आरोग्य सेविका दहा टकके गर्भपात नोंदवत नाही. शंभर रूपयांची गर्भपाताची गोळी चार हजार रुपयांना विकली जाते. या संदर्भात तक्रार दाखल करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनावर राज्यातील एका निवृत्त महिला पोलीस अधिकाऱ्याचा दबाव आहे. गर्भपात औषध प्रकरणाशी तिच्या पतीचा संदर्भ असल्याने सर्व चौकशी अडकून पडली आहे.

प्राप्त आकडेवारीनुसार सातारा जिल्हयात 897 बेकायदेशीर गर्भलिंग निदान झाले. या रॅकेटची व्याप्ती सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्हयात आहे. 2 मे 2018 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना आकडेवारी देउनही काहीच कारवाई झाली नाही. अन्न औषध प्रशासन जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक घेऊन कारवाई करण्याचे ठरले मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही. गेल्या चार वर्षापासून 920 च्यावर मुलींच्या संख्येत वाढच झाली नाही. बेकायदेशीर रॅकेट बेकायदा गर्भपात करून सातारा जिल्ह्यातील मुली गायब केल्या जात आहेत. गर्भपात औषध विक्री प्रकरणाचा मूळ सूत्रधार व पुरवठादार कंपनी व विक्री करणारी साखळी यांना अटक करण्याची मागणी देशपांडे यांनी केली.

सोनोग्राफी मशीन कंपनीचा वापर करणारे डॉक्‍टर यांच्यावर गुन्हे दाखल करणे व सातारा जिल्ह्यातील शंभर टक्के गरोदर मातांची नोंदणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला द्यावेत या मागण्यांचा पुनरुच्चार वर्षा देशपांडे यांनी केला. या संदर्भात संबधित यंत्रणांनी जर कारवाई न केल्यास लेक लाडकी अभियान पंधरा दिवसाच्या आत त्या त्या यंत्रणांना नोटीस बजावून योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देशपांडे यांनी दिला.

No comments

Powered by Blogger.