प्रांतांच्या विनंतीवर धनगर समाज आरक्षण कृती समितीची भूमिकाफलटण  : धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने 9 दिवस ठिय्या आंदोलन सुरू आहे. सोमवारी उपविभागीय अधिकारी तथा संतोष जाधव व तहसीलदार विजय पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. याबाबत पुढील दोन दिवसात याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने दिले.

धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने धनगर समाजाच्या अनुसुचित जमात (एस.टी) आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते. नवव्या दिवशी आंदोलनस्थळी धनगर समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या धनगर समाजाच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दि 29 जुलैपासून धनगर समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनात धनगर समाज बांधव शेळी मेंढ्यासह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

तसेच जागरण गोंधळ, गजी नृत्य, ढोल नाद, अशा विविध प्रकारे शासनाचा विरोध करण्यात आला. धनगर आणि धनगड ही फक्त प्रशासकीय चूक आहे. राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही. धनगर शब्दामध्ये ‘र’ चा ‘ड’ झालेला असून तो देशातील अन्य राज्यांप्रमाणे दुरुस्त करण्याची मागणी धनगर समाजाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विनंतीवर याबाबत दोन दिवसात निर्णय घेवू, असे धनगर समाजाच्या वतीने सांगण्यात आले.

No comments

Powered by Blogger.