नगरसेवकाने स्वखर्चाने पथदिवे बसवून साजरा केला आईचा वाढदिवस


लोणंद :  लोणंद नगरपंचायतचे विरोधीपक्ष नेते राजूशेठ डोईफोडे आणि त्यांचे बंधु शामसुंदर डोईफोडे या दोघा भावांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या आईचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. 

शिवशक्ती उद्योग समुहाचे मालक असलेल्या या दोघा भावांनी आपली आई श्रीमती लक्ष्मीबाई सिताराम डोईफोडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक सहामधे स्वखर्चाने एलईडी पथदिवे बसवून एक आदर्श घालून दिला आहे. एकीकडे नगरपंचायतच्या माध्यमातून काम करण्याची अनेकांची उदासीनता असल्याने अनेक ठिकाणी रखडलेली कामे दिसत असताना यांनी मात्र नगरपंचायतची वाट न बघता आपल्या प्रभागातील विकासकामे स्वतःच्या खिशातून करण्याचे दातृत्व दाखवून आदर्श नेता कसा असावा याचे उदाहरणच घालून दिले आहे. या कामाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments

Powered by Blogger.