हुतात्मा उद्याना नजीकचे हातगाडे हटवले


सातारा : येथील हुतात्मा उद्याना नजीकचे हातगाडे बुधवारी हटवण्यात आले. पाच गाडे जप्त करण्याची कारवाई करण्यात आल्याने संबधितांची चांगलीच पळा पळ झाली. अतिक्रमण मोहिमेला पोलीस बंदोबस्त देण्यात आल्याने वादावादीचे प्रकार घडले नाहीत. अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम शैलेश अष्टेकर आणि आठ कर्मचाऱ्यांच्या पथकाने भूविकास बॅंक परिसरातील टपऱ्या व हातगाडे हटवले.

दुपारी चारच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. संबधितांना चोवीस तासापूर्वीच तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. कारवाई दरम्यान कोणताही अडथळा झाला नाही. काही हातगाडे जप्त करून हुतात्मा उद्यानातच जमा करण्यात आले. धंदेवाईक शिक्षण शाळा ते हुतात्मा उद्यान प्रवेशद्वार या दरम्यानचा शंभर मीटरचा फूटपाथ मोकळा करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

No comments

Powered by Blogger.