संकल्प फाऊंडेशन च्या वतीने राजुरी चौफुला ते मुंजवडी या रस्त्यावरील चा-याचे व खड्डयांचे मुरमीकरण
राजुरी चौफुला ते मुंजवडी या रस्त्याची अवस्था फारच दैनीय झाली होती. रस्त्या लगतच्या शेतकऱ्यांनी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चा-या खोदलेल्या होत्या. तसेच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. अनेक वेळा या रस्त्याची दूरस्तीची मागणी केली जात होती. अनेक वेळा या रस्त्यासाठी वर्तमानपत्राने देखील आवाज उठवला होता. पण संबंधीत विभागाने या रस्त्याच्या कामाकडे कानाडोळा केला होता. संबंधीत रस्त्याने दु चाकी, चार चाकी, ऊसाचे ट्रॅक्टर ट्रक व इतर वाहनांची वाहतूक करताना फार त्रास होत होता. या रस्त्यावर 47 चा-या व असंख्य खड्डे पडल्याने रस्ता फारच खराब झाला होता.
संकल्प फाऊंडेशन वतीने महिन्यातील एक दिवस श्रमदान करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने राजुरी चौफुला ते मुंजवडी या रस्त्याचे श्रमदान करून मुरमीकरण करण्यात आले आहे. या श्रमदानात संकल्प फाऊंडेशन च्या सुमारे 50 युवकांनी सहभाग घेतला होता.
या रस्त्याच्या दूरस्तीच्या कामाबद्दल संकल्प फाऊंडेशन चे राजुरी, मुंजवडी, कुरवली बु, तामखडा, पवारवाडी, हनुमंतवाडी या गावातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. याच मार्गाने अनेक लोक शिखर शिंगणापूर व बारामती ला जातात. हा रस्ता दूरस्थ झाल्याने लोकांचा होणारा त्रास कमी झाला आहे.
या श्रमदानासठी संकल्प फाऊंडेशन चे अध्यक्ष अनिल चव्हाण, उपाध्यक्ष सोमनाथ रणदिवे, खजिनदार संतोष काशिद, सचिव प्रेम शिंगाडे, कार्याध्यक्ष गणेश बागाव, संपर्क प्रमुख पै. बिपीन बागाव, सुखदेव रणदिवे, विजय रणदिवे आदींसह संकल्प फाऊंडेशन चे सर्व सदस्य उपस्थित होते.
Post a Comment