Your Own Digital Platform

मायणी ( कचरेवाडी ) येथे दि.२३ पासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ


मायणी : मायणी ( कचरेवाडी)ता. खटाव येथे दि. २३ते ३० अखेर श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने ह.भ.प. पांडुरंग माळी महाराज ( मायणी), ह.भ.प. सुभाष घाडगे महाराज ( मुंबई), ह.भ.प. शंकर साखरे महाराज (सातारा ), ह.भ.प. तुकाराम महाराज खेडेकर ( मुंबई), ह.भ.प. बापू साहेब महाराज (कण्हेरी ), ह.भ.प. उमेश महाराज पुरी (आळंदी), ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज देवडे( आळंदी ) यांची सुश्राव्य कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत.

रविवार दि. २६ रोजी श्री सत्यनारायण पूजा व दु.३पासून महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. गुरुवार दि.३oरोजी श्री संत बाळूमामा पुण्यतिथी व महाआरती सोहळा संपन्न होणार आहे. याच दिवशी सकाळी ९ते१२ या वेळेत ह.भ.प. संजय महाराज कावळे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर १२वांजता फुलांचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि.२९ रोजी दु. ३ते ५ या वेळेत मायणीचे गजी नृत्य, श्री विठोबा वाजंत्री मंडळ