आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

धनगर समाजाचा विविध मागण्यांसाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


सातारा : भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या कलम 342 महाराष्ट्र राज्याच्या 9 परिशिष्टात अ. क्र 36 वरती ओरॉन धनगड असा उल्लेख झाल्याने गेल्या साठ वर्षापासून धनगर समाज अन्याय सहन करत आहे. मुळात धनगड ही जात अस्तित्वात नसताना राज्यात 43 हजार तर सातारा जिल्ह्यात 149 धनगड बांधव असल्याची खोटी माहिती सांगितली जाते. केंद्रात धनगर ही जात ओबीसी तर महाराष्ट्रात भटक्‍या विमुक्त जमातीत आहे. सरकारला धनगर बांधवांना एसटी आरक्षण देण्यासाठी दि. 24 रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चामध्ये गजी नृत्य व शंभर ढोल पथकांचा समावेश आहे. सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर वीस हजार धनगर बांधव जमा होतील असा दावा संयोजकांनी केला. 

सैनिक स्कूल मैदान झेडपी चौक जिल्हा न्यायालय मार्ग मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचणार आहे. पाच कन्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. मोर्चामध्ये आरक्षण फलक, बॅनर, टोपी, झेंडे या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जाणार आहे. मोर्चा हा कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण न करता शांततेच्या मार्गाने काढला जाणार असल्याचा दावा संयोजकांनी केला. जिल्हा उपनिबंधक फॉरेस्ट कॉलनी, (कराड, पाटण), तालीम संघ मैदान (परळी विभाग), जिल्हा परिषद मैदान (महाबळेश्वर, जावली, वाई), बॉम्बे रेस्टॉरंट चौक (फलटण, माण, खंडाळा) या पध्दतीने वाहनांच्या पार्किंगचे नियोजन कृती समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.