आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

न्यू फलटणच्या विरोधात शेतकरी आक्रमक; तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्याफलटण: साखरवाडी (ता. फलटण) येथील न्यू फलटण शुगर वर्क्स या साखर कारखान्याने २०१७-१८ सालातील गळीत हंगामाचा ऊस उत्पादकांचा हप्ता अद्याप दिला नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. गत काही महिन्यांपासून तहसीलदार विजय पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी दाद मागीतल्यानंतरही फक्त आश्वासने मिळत होती. आज गुरुवार (दि.२३) तहसीलदार पाटील यांच्या दालनात शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. आजच निर्णय द्या, न्यू फलटण शुगरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

तहसील कार्यालयात सुरू असलेल्या या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने फलटण तालुका हादरला आहे. यापूढे शेतकरी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.


काय सुरू आहे तहसील कार्यालयात पहा पुढील व्हिडीओ...