मान्याचीवाडी ग्रामपंचायतीत व्हिडिओ कॉन्फरन्सने अधिकाऱ्यांचा संवाद


सातारा : मान्याचीवाडी, ता. पाटण ग्रामपंचायतीची आजची ग्रामसभा पार पडली. देशात प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ कैलास शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रनेचे प्रकल्प संचालक नितीन थाडे,उपमुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामसभेला उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांची बायोमेट्रिक हजेरी घेण्यात आली.

पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची मंगळवारी ग्राम सभा झाली. या सभेत थेट सहभाग घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीतील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सभेत शिक्षण, आरोग्य, कृषी, घरकुल, ग्रामपंचायतिशी निगडित विषयांवर चर्चा करण्यात आली. डॉ कैलास शिंदे यांनी मुख्याध्यापक आले आहेत का शाळेत किती पट आहे, तुमचे न्यास सर्वेक्षण झाले का असे प्रश्न विचारले. यावर मुख्याध्यापकांनी सर्वेक्षण झाले असून, विद्यार्थींची बौध्दिक पातळी चांगली असल्याचे सांगितले.

तसेच आरोग्य विभागाच्या मातृवंदना योजना, हिमोग्लोबिन व रक्त तपासणीची माहिती आरोग्य सहाय्यकांकडून जाणून घेतली. ग्रामसभेला महिलांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले. व्हीसीचा उपक्रम सुरळीत पार पडल्यानंतर मन्याचीवाडी ही देशातील पहिली अशी ग्रामपंचायत झाली आहे की तिच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधण्यात आला आहे.

No comments

Powered by Blogger.