काळंगे विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश


पुसेगाव : मोळ (ता. खटाव) येथील गुरुवर्य गणपतराव काळंगे विद्यालयातील इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चंदना संताजी देशमुख, श्रेया भरत नांगरे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत. तर इयत्ता आठवी उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत समृद्धी प्रशांत घाडगे, पायल शामराव कर्णे, पराग हेमंत घाटगे हे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. 

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव काळंगे, सर्व संचालक, बाळासो वाघ, गजानन वाघ, शिवाजीराव वाघ, सुभाष बोराटे, अरुण वाघ, सरपंच शोभा घाटगे, चेअरमन श्रीकांत घोरपडे, शैलेश वाघ, जालिंदर वाघ, शाम कर्णे, प्रशांत घाडगे, विलास गोसावी मुख्याध्यापक संजय गोडसे व सर्व सहकारी, पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले

No comments

Powered by Blogger.