महसूल दिनानिमित्त शाम सूर्यवंशी यांचा सत्कार


गोंदवले : नरवणे, ता. माण येथील तलाठी शाम सूर्यवंशी यांना महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते आदर्श तलाठी म्हणून सन्मानपत्रासह गौरवण्यात आले.

महसूल विभागाकडून 2017-18 काळात महसूल विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दि. 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, माण-खटावचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते माण तहसीलचे कुकुडवाड मंडलातील नरवणे सजाचे तलाठी शाम सूर्यवंशी यांना आदर्श तलाठी म्हणून गौरविण्यात आले.

माण तहसीलमधील कुकुडवाड मंडलातील नरवणे सजामध्ये नरवणे, दोरगेवाडी, काळेवाडी या गावांचा समावेश आहे. याप्रसंगी शाम सूर्यवंशी यांचे नरवणेचे सरपंच दादासाहेब काटकर, उपसरपंच राजेंद्र जगदाळे, दोरगेवाडीच्या सरपंच लताबाई चौरे, उपसरपंच संजय चव्हाण, काळेवाडीच्या सरपंच अरुणा महानवर, उपसरपंच बिरुदेव ठोंबरे, अशोक काटकर, दत्ता जाधव, विक्रम दोरगे, विलास खरात तसेच तिन्ही गावांच्या ग्रामस्थांसह गणेश मंडळ नरवणे, नवसिद्ध स्पोर्टस क्‍लब दोरगेवाडीयांनी अभिनंदन केले.

No comments

Powered by Blogger.