कराडच्या मारुतीबुवा मठाच्या मठाधिपती ह.भ.प. जयवंतबुवा पिसाळ


कराड : येथील श्री मारुतीबुवा मठाचे मठाधिपती बाजीराव जगताप यांना बदलण्यात आले असून नवे मठाधिपती म्हणून ह.भ.प. जयवंतबुवा पिसाळ यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती मठाचे अध्यक्ष य. दा. माने यांनी बुधवारी कराड येथे पत्रकार परिषदेत दिली.माने म्हणाले, मारुतीबुवा कराडकर मठाबाबत ज्या काही वावड्या उडत आहेत त्या बिनबुडाच्या व विना आधाराच्या आहेत. विश्वस्त मंडळाने मारुती बुवा मठाचे मठाधिपती म्हणून ह.भ.प. जयवंतबुवा यांची निवड केली आहे. 

त्यांची निवड करताना वारकरी सांप्रदायातील अत्यंत महनीय व्यक्‍तींशी सल्ला मसलत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांची अधिकृत नोंद धर्मादाय आयु्क्‍तांकडे केली आहे. त्यामुळे मुळात मठात सेवेकरी असलेले बाजीराव जगताप हे मठाचे स्वयंघोषित मठाधिपती असल्याचे सांगत आहेत. ते वारकरी सांप्रदायाची पर्वा न करता स्वार्थी हेतूने लोकांची दिशाभूल करत आहेत. हिशेबाबाबतही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत, असा आरोपही माने यांनी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी मठाचे विश्वस्त डॉ. मधुकर पिसाळ, मोहन चव्हाण, विनायक विभुते, दिलीप चव्हाण उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.