लोणंदमध्ये दुचाकी चोरटे जेरबंद


लोणंद : लोणंद येथील अहिल्यादेवी होळकर चौकाजवळ दुचाकी चोरणाऱ्या तिघांना गस्तीवर असलेल्या लोणंद पोलिसांनी अटक केली. सुनिल लाला जाधव (वय 19, रा. बदलापूर जि. जालना हल्ली रा. यश ढाबा माळेवाडी, जि. सातारा), अक्षय रंगनाथ लोखंडे (वय 18) व विपुल तानाजी नलवडे (दोघेही रा. माळेवाडी, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, गस्तीवर असलेले लोणंद पोलिस ठाण्याचे कर्मचारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास अहिल्यादेवी होळकर चौकात आले असताना नंबरप्लेट नसणाऱ्या दुचाकीवरुन तिघेजण घाईघाईत निघाले होते. पोलिसांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरची दुचाकी ही चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या तिघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यातही जबरी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या तिन्ही आरोपींना अटक करुन लोणंद पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीष दिघावकर, फौजदार क्षीरसागर, हवालदार पवार व चालक पांचांगणे व दोन होमगार्ड यांनी ही कारवाई केली.

No comments

Powered by Blogger.