जलकुंभ मोजतोय अखेरची घटका


शाहूपुरी : अर्कशाळेशेजारील सहा लाख लिटरची क्षमता असलेली सार्वजनिक नळपाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची दूरावस्था झाली आहे. या पाण्याच्या टाकीला बऱ्याच ठिकाणी तडे गेल्याने टाकीचे सिमेंटचे पोपडे पडत आहेत. ती केंव्हाही कोसळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. कोटेश्‍वर मंदिर अर्कशाळेशेजारी मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही टाकी 25 वर्षापूर्वीची आहे. 

अभयसिंहराजे भोसले यांच्या कालखंडात बांधलेली आहे. तेंव्हापासून याच टाकीतून प्रतापगंज पेठ, शुक्रवार पेठ या भागाला पाणीपुरवठा करण्यात येत होता. या टाकीलगत अनेक छोटी मोठी 50-60 घरे आहेत. नेहमीच्या वर्दळीच्या भागात ही टाकी असल्याने या ठिकाणी येथील लोकांची ये-जा सतत असते.
तसेच कोणतीही दुर्घटना होण्याआधी ही टाकी पाडण्यात यावी. अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. त्यामुळे नवीन टाकी बांधण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा.

भविष्यात टाकी कोसळण्याची शक्‍यता आहे. पाण्याच्या टाकीशेजारी बरेच नागरिक राहात आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. या टाकीच्या बांधकामाचे सिमेंटचे पोपडे पडत आहेत. तसेच बऱ्याच ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवित हानी होण्या आधी संबंधित प्रशासनाने वेळीच उपाययोजना करावी. – अजित सपकाळ, नागरिक

No comments

Powered by Blogger.