दरोडाप्रकरणी आरोपींना दहा वर्षाची सक्तमजुरी


पिंपोंडे बु॥ : रोहा तालुक्यातील कोलाड जवळील दरोड्याप्रकरणी आरोपींना दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा माणगाव सत्र न्यायालयाने सुनावली आहे. तीन वर्षापूर्वी घडलेल्या या दरोड्याप्रकरणी तातडीने तपासाची चक्रे फिरवून महिनाभारात आरोपींच्या मुसक्या आवळणारे रोह्याचे तत्कालीन पोलीस निरिक्षक संजय धुमाळ यांनी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोलाड धरणाजवळ डोलवहाळ बाईतवाडी येथे 11 डिसें 2015 रोजी मध्यरात्री एक वाजता हा दरोडा पडला होता . कोंबडयाची विक्री करून रविंद्र चंद्रकात लाड व त्यांचे सहकारी 4 लाख 90 हजार 500 रू रक्कम घेऊन दुचाकीवरून अलिबागकडे जात होते. यांची माहिती आरोपी सचिन शंकर जाधव याने सुनील विष्णु मुकणे याला मोंबाईल वरून दिली. त्यामुळे आरोपी विष्णु मुकणे,दिलीप विष्णु पवार,सिताराम वसंत सावंत,तुकाराम विठ्ठल जाधव,यांनी रविद्र लाड व त्यांच्या साथीदाराला काठीने मारहाण करून त्यांच्याजवळील रक्कम हिसकावुन घेत पसार झाले. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात दरोडा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालीन पो.नि.संजय धुमाळ यांनी तपासांची चक्रे वेगांने फिरवली व आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. माणगाव सत्रन्यायालयात टी.एम.जहागीरदार यांनी सर्व आरोपीना दोषी ठरवत 10 वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी 50000 हजार रू दंड ठोठावला आहे. पो.नि . संजय धुमाळ सध्या नौपाडा ठाणे येथे कार्यरत असुन या निकालामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments

Powered by Blogger.