पुस्तकांचं गाव भिलारचे पठार रानफुलांनी बहरले


सातारा (कुडाळ) : सातारा जिल्ह्यातील जगप्रसिध्द फुलांच्या कास पठारापाठोपाठ महाराष्ट्रचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणारे महाबळेश्वर सध्या हिरवाईने नटले आहे. थंड हवेचे ठिकाण पाचगणी महाबळेश्वर सह देशात प्रसिद्ध झालेले महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकांचे गाव भिलार परिसरातील शेकडो एकर हिरवीगार पठारे डोंगर माथे विविध रंगीत व पांढऱ्या शुभ्र फुलांनी भरलेली आहे.त्यामुळे पावसाळी पर्यटनाला अनूभवण्यास येणाऱ्या पर्यटकांना ही पांढरी शुभ्र फुलं आकर्षित करू लागली आहेत. 

श्रावणाच्या आगमनाची चाहूल लागल्यानंतर फुलांच्या कास नतंर महाबळेश्वर पाचगणी, जावळी, पाटण, या निसर्ग डोंगरी भागात पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्यात हिरव्यागार निसर्गात विविध रंगाची रानफुलं दर वर्षी जन्म घेतात व या परिसरातील वनराईने रूप फुलवतात अशीच रान फुल भिलार , पाचगणीचे हिरवे पठार पांढऱ्या शुभ्र रानफुलांनी मनमोहित करून टाकत आहेत.

No comments

Powered by Blogger.