Your Own Digital Platform

तडीपारांविरोधात कारवाया सुरुच राहणार; पंकज देशमुख


सातारा : साताऱ्याची गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याचे जे प्रयत्न संदीप पाटील यांनी केले तेच काम मी पुढे नेणार आहे. मोक्का तडीपारीच्या कारवायांचा तडाखा सुरूच राहील अशा शब्दात साताऱ्याचे नूतन जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी आपले इरादे स्पष्ट केले.पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी गुन्हेगारीची माहिती घेतली. 

देशमुख म्हणाले , ‘‘संदीप पाटील यांनी खूप मोठे काम केले आहे, तेच काम मला पुढे न्यायचे आहे. पोलिस दलातील जे लोक गुन्हेगारांना मदत करतात त्यांच्यावर कारवाई होईल, कोणताही राजकीय दबाव आपण घेणार नाही. गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करू. असा विश्वास देशमुख यांनी यावेळी व्यक्‍त केला. यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाने त्यांचे स्वागत केले.