मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या लोणंद बंद


लोणंद :सकल मराठा समाज लोणंद व परिसराच्या वतीने उद्या लोणंद ता. खंडाळा बंद चे आवाहन करण्यात आले आहे. काल लोणंदचा बाजार चा दिवस असल्याने मराठा समाजाने लोणंद बंद न ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि लोणंद नगरपंचायतीच्या समोर शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन केले होते. 

या आंदोलनाला सर्व राजकीय व सामाजीक क्षेत्रातील नागरीकांनी पाठींबा दिला होता. मात्र लोणंदच्या आसपास असणाऱ्या मराठा बांधवांना लोणंदच्या मराठा बांधवांनी घेतलेला हा निर्णय मान्य नव्हता काल सकाळी या विषयावर वादविवादही झाले होते. याच विषयावर काल सायंकाळी लोणंद व आसपासच्या गावातील मराठा बांधवांची मिटींग आयोजीत करुन उद्या लोणंद बंद चा निर्णय घेण्यात आला.

उद्या सकाळी ०९ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोणंद येथून मराठा समाजास आरक्षण मिळण्याकामी भव्य रॅली निघणार आहे तरी सर्व समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.