मुलाच्या मृत्युच्या धक्कयाने मातेनेही सोडले प्राण


म्हसवड : येथिल सणगर गल्ली येथे राहणारे रामचंद्र भानुदास ढोबळे यांचे अल्पशा आजाराने दि. २ रोजी निधन झाले त्यांच्या निधनाचा धक्का त्यांच्या आईला तीव्र बसल्याने त्यांचेही मुलाच्या विरहाने दि. ३ रोजी निधन झाल्याने सर्व शहरात याबद्दल हळहळ व्यक्त होत असुन माय लेकाच्या आकस्मिक मृत्युमुळे संपुर्ण सणगर समाजावर शोककळा पसरली आहे. 

येथिल सणगर गल्ली येथे रामचंद्र ढोबळे हे आपली आई श्रीमती भामाबाई ढोबळे यांच्यासह पत्नी व २ मुलांसमावेत रहावयास असुन गत काही दिवसांपासुन ते आजारी होते मोलमजुरी करुन जगणारे शांत व संयमी कुटुंब म्हणुन या कुटुंबाकडे पाहिले जाते रामचंद्र ढोबळे यांची अर्थिक परिस्थिती बेताची असल्याने घरी फक्त त्यांची वृध्द आईच असायची उर्वरीत सर्वजण कामाला जातात.

 गत काही दिवसांपासुन रामचंद्र ढोबळे हे आजारी असल्याने ते घरीच उपचार घेत होते या आजारातुन ते उठलेच नाही दि. २ रोजी त्यांचे निधन झाले अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले , मात्र मुलावर जिवापाड प्रेम असलेल्या त्यांच्या आई भामाबाई यांना हा धक्का सहन झाला नाही रात्री मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले तर सकाळीच त्यांच्या आईचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

No comments

Powered by Blogger.