साताऱ्यात फटफट्या, बुलेटवर कारवाई


सध्या बुलेटचे फॅड आहे. सायलन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश्‍श आवाज करत या बुलेट रस्तोरस्ती फिरतात. त्यांच्या फटफट आवाजाने ध्वनिप्रदूषण होते आणि त्याचा नागरिकांना नाहक त्रास होतो. याबाबत पोलिसांकडे अनेक तक्रारी आल्याने त्यांनी बुलेटविरोधात कारवाई सुरू केली आहे.

सातारचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजमाने यांनी याबाबत शाहूपुरी,सातारा शहर पोलिसांना सुचना दिल्या आहेत.
शहरात वेगाने मोटारसायकल चालविणाऱ्या मोटारसायकल वेडयांनी धुमाकूळ घातलेला आहे. त्यातच कर्णकर्कश्‍श आवाज करणाऱ्या बुलेटची भर पडलीे आहे.

तरुण मुले या बुलेटवरून कर्णकर्कश्‍श आवाज करत शहरात धुमाकूळ घालत असतात. बुलेटच्या सायलन्सरला रबर लावून बुलेटचा आवाज वाढवण्याचीे नवीेन फॅशन रूढ होत असून यामुळे नागरिकांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो.

त्यामुळे सायलन्सर, हॉर्न यात फेरफार करून आवाज करणाऱ्या बुलेट चालकांवर कारवाई करण्याचीे मागणी नागरिकांनी केली होती. त्या मागणीचा विचार करून गजानन राजमाने यांनी याबबात वाहतूक पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार पोलिसांनी रविवारी दिवसभर बुलेटचालकांची तपासणी व कारवाई सुरू केली आहे. बुलेटच्या सायलन्सरमध्ये रबर लावला की मूळ बुलेटच्या आवाजात जवळपास दहा पटीने आवाज वाढतो. त्यामुळे पोलिस येणारी प्रत्येक बुलेट थांबवुन तिच्या आवाजाची खात्री करत आहेत.

बुलेटचा आवाज वाढवल्याने सर्वांचे लक्ष वेधले जाते. विशेषत: मुलींमध्ये प्रभाव पाडण्यासाठी तरुण मुले असे प्रकार करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.