फत्यापूर विकास सोसायटीचे कामकाज आदर्शवत : आ. शिवेंद्रसिंहराजे


सातारा : फत्यापूर विकाससेवा सोसायटीने सभासद शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकेच्या विविध कर्ज योजनांद्वारे आर्थिक पतपुरवठा केला असून सोसायटीची वसुलीही 100 टक्‍के आहे. सोसायटीने सभासद शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावताना संस्थेलाही प्रगतीपथावर नेले आहे. फत्यापूर विकाससेवा सोसायटीचे कामकाज आदर्शवत आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे चेअरमन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

फत्यापूर ता. सातारा येथील विकाससेवा सोसायटीच्या नूतन इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी आ. बाळासाहेब पाटील, अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, विद्यमान सदस्य मानसिंगराव जगदाळे, माजी सदस्य यशवंत साळुंखे, कारखान्याचे माजी चेअरमन रामभाऊ जगदाळे, कराड उत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष देवराज पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सोसायटीचे चेअरमन अशोक घाडगे (सर) यांनी सोसायटीच्या कामकाजाचा आढावा घेतला. ते म्हणाले, सोसायटी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत असून कोणतेही गटतट न ठेवता संस्थेने 7 कोटींपेक्षा जादा कर्जवापट सभासद शेतकऱ्यांना केले आहे. सभासदांना यावर्षी 10 टक्‍के लाभांश वाटप करण्याचा मानस संचालक मंडळाचा आहे. तसेच नवीन इमारत उभारताना जिल्हा बॅंक आणि संस्थेच्या सभासदांनी केलेल्या मदतीबाबत घाडगे यांनी आभार मानले.

दरम्यान, सोसायटीच्या नवीन हॉलमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका सुरु करण्यासाठी गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाच्या मंत्रीमहोदयांचे सहायक राजेंद्र घाडगे यांनी 5 लाख रुपये देणगी देण्याचे जाहीर केले. याबद्दल सभासद, ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. तुषार घाडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमास सागर पाटील, धनंजय शेडगे, अजिंक्‍यतारा कारखान्याचे व्हा. चेअरमन राजू पाटील, पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत, हणमंतराव शेडगे आदी मान्यवरांसह सह्याद्री साखर कारखाना, अजिंक्‍यतारा साखर कारखान्याचे संचालक, जिल्हा बॅंकेचे वरिष्ठ अधिकरी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.