एसटीखाली सापडून मायलेकींचा दुर्दैवी अंत


मेढा : जवळवाडी (ता. जावली) येथे एसटीखाली सापडून मायलेकींचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना रविवारी दुपारच्यावेळी घडली. शालिनी रामू चव्हाण (वय 22) व अंजली रामू चव्हाण (वय 4) असे मृत्यू झालेल्या मायलेकींचे नाव आहे.

अंजली चव्हाण या जवळवाडी येथील बालगोपाळ वस्ती येथील रहिवाशी आहेत. रविवारी त्या कण्हेरमार्गे सातारा-मेढा या एसटीने मेढ्याला निघाल्या होत्या. एसटी पाचच्या सुमारास मेढा येथे आली असता त्या मुलीसमवेत एसटीतून उतरल्या. आणि लगेचच एसटीच्या पुढीलबाजूने रस्ता ओलांडत होत्या. 

दरम्यान, शालिनी या अगदी एसटीला लागूनच पुढील्या बाजुने निघाल्याने चालकाला त्या दिसल्याच नाही. आणि संबंधित चालकाने एसटी सुरु केल्याने शालिनी चव्हाण या आपल्या चार वर्षाच्या मुलीसह एसटीच्या चाकाखाली सापडल्या. एसटीचे चाक दोघींच्याही अंगावर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची नोंद मेढा पोलिस ठाण्यात झाली असून एसटी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अपघाताच्या घटनेमुळे मेढा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

No comments

Powered by Blogger.