Your Own Digital Platform

पुस्तके आयुष्याला कलाटणी देतात : महेंद्र बाचल


किडगाव : पुस्तके एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देवू शकतात. त्या पुस्तकातील एक पान एखाद्याचे आयद्याचे आयुष्य बदलू शकते. असे प्रतिपादन कूपर उद्योग समुहाचे महेंद्र बाचल यांनी केले. सातारा औद्योगिक वसाहती मधील लोकमंगल हायस्कूल आयोजित मला आवडलेले पुस्तक या समारंभात ते बोलत होते. यावेळी सातारचे सुप्रसिध्द सर्जन डॉ. शशिकांत पवार, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरिष चिटणीस, राजेंद्र पवार, विनायक भोसले, गजानन शिंदे, मुख्याध्यापिका मंदा निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

रोज आपण एक तरी पान वाचले पाहिजे. जगाचा आत्तापर्यंत जो विकास झाला तो वाचनामुळे आणि जो आपला ऱ्हास झाला तो टीव्ही, मोबाईलमुळे पुस्तक वाचनारा कधीही व्यसन करत नाही असे प्रतिपादन बाचल यांनी केले. डॉ. शशिकांत पवार यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती करा, मोठे व्हा, असा सल्ला दिला. वाचन करणारी माणसे मनाने, विचाराने आणि कृतिनेही श्रीमंत होतात. वाचनाने आपल्यामध्ये नम्रता येते. यावेळी शिरिष चिटणीस म्हणाले वाचनातून विद्यार्थी समृध्द होतो. पुस्तके आपणामध्ये बदल घडवितात.

प्रत्येकाला संधी असते, त्या संधीचा आपण वापर करायला शिकलं पाहिजे. गेल्या वर्षापासून मी वाचलेले पुस्तक या उपक्रमामुळे वाचन संस्कृती या विद्यालयास वाढीस लागते. कार्यक्रमात मोक्षदा मुळीक, साक्षी कांबळे, वैभवी गवळी, किर्ती मोरे, यश गुरव या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्‍त केली. कार्यक्रमास प्रदीप लोहार, उदय जाधव, बाळकृष्ण इंगळे, सतीश पवार, यश शिलवंत, अभिजीत वाईकर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुलाब पठाण व प्रतिभा वाघमोडे यांनी केले. तर काकासो निकम यांनी आभार मानले.