आनंदवन प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
कोळकी : आनंदवन प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुद्र निपाने हा विध्यार्थी होता. दुर्गेश इंगळे ,साहिल काळुखे हे विध्यार्थी वेशभूषा परिधान करून उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तेजश्री जाधव, मनीषा निपाने, मुख्याध्यापिका सौ. स्वाती फुले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अनुलेखन, शुध्दलेखन, निबंधलेखन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.विध्यार्थी, शिक्षक यांनी मनोगते व्यक्त केली.याप्रसंगी शिक्षक, विध्यार्थी, पालक उपस्थित होते.
Post a Comment