अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार


भुईंज : ग्वाल्हेर बंगळूर आशियाई महामार्गावर सुरुर गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वृद्ध ठार झाला. हा अपघात रविवारी पहाटेच्यावेळी घडला.

महामार्गावर सुरुर येथील स्वस्त धान्य दुकानासमोरुन चाललेल्या 55 वर्षीय वृद्धास रविवारी पहाटेच्या वेळी धडक दिली. या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू झाली. येथील ग्रामस्थांनी अपघाताची माहिती सुरुरच्या महिला पोलीस पाटील निर्मलाताई पवार यांना दिली. त्यांनी अपघाताची माहिती तात्काळ भुईंज पोलीस ठाण्याला दिली. 

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार प्रवीण बाबर, अमोल पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह कवठे येथील प्राथमिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान, अपघातातील मृताची ओळख पटलेली नाही. अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.

No comments

Powered by Blogger.