लोणंदमध्ये क्रेन ऑपरेटर युवकाचा खून


लोणंद : लोणंद येथील शिरवळरोड वरील एमआयडीसी जवळ असणाऱ्या इमारती एकाचा खून झाला आहे. काल रात्री अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून क्रेन ऑपरेटर असलेल्या युवकाचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने लोणंदमध्ये खळबळ उडाली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोणंद - शिरवळ रोडवरील लोणंद पोलीस ठाणे हददीत एमआयडीसीकडे जाणाऱ्या रोडवर पाटील वस्ती नजीक असणाऱ्या इमारतीमध्ये किरण पवार यांचे क्रेनचे ऑफीस आहे. त्या ठिकाणी क्रेन ऑपरेटर चंद्रकांत साळुंखे झोपले असताना रात्री अज्ञात इसमांनी डोक्यात दगड घालुन खून केला.

या घटनेची माहीती मिळताच लोणंद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली . या घटनेचा पंचनामा केला. घटना स्थळी फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांनी भेट दिली आहे. खुनाचा तपास लोणंद पोलीस करत आहेत.

No comments

Powered by Blogger.