कराड-विटा मार्गावर आंदोलकांचा जनावरांसह ठिय्या


कराड : कराडमध्ये सकाळी साडेसातच्या सुमारास कराडकरांनी सामुहिक मुंडण केल्यानंतर ओगलेवाडी परिसरातील मराठा समाज बांधवांनी कराड - विटा मार्गावरील ओगलेवाडी (कराड रेल्वे स्टेशन) येथील कराड - विटा राज्य मार्गावर जनावरांसह ठिय्या मारला. मराठा बांधवांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे कराड-विटा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून मराठा बांधवांनी रस्त्यावर ठिय्या मारल्यानंतर जवळपास एक तासाहून अधिक काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

No comments

Powered by Blogger.