Your Own Digital Platform

कराड-चिपळुण रेल्वे मार्गाचे भवितव्य अधांतरी


पाटण  : कोल्हापुर-वैभववाडी रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय रेल्वे मंत्रायलाने मंजुरी दिल्याने कोल्हापुर-वैभववाडी रेल्वे प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.मात्र बहुचर्चित कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणा-या कराड-चिपळुण रेल्वे मार्गाचे भवितव्य या प्रकल्पामुळे अधांतरी झाले आहे.

कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणा-या कराड-चिपळुण रेल्वे मार्गाला सुरवातीला मंजुरी मिळाली होती.112 किलो मीटर लांबी आसणा-या या रल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने अर्थ संकल्पात 366 कोटी रूपयेच्या निधीला मंजुरी ही दिली होती.मात्र महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने कोल्हापुर-वैभववाडी प्रकल्पाचे भवितव्य उजळले आहे.केंद्रीय पातळीवर हालचाली करून आखेर या नविन रल्वे मार्गासाठी 2 हजार 770 कोटी रूपये केंद्र सरकारच्या मंजुर केले आहेत.कोकणात होणा-या रिफायनरी प्रकल्पामुळे या रेल्वे मार्गाचे भवितव्य उजळले आहे.

केंद्र व राज्यात सत्तेवर येताच भाजपा सरकारणे कोकणातील बंदराच्या विकासावर भर दिला आहे.जिंदाल फिनोलेक्‍स आरजीपीपीएल कंपनीची बंदरे या ठिकाणी आहेत.तर जहाज बांधणीसाठी डॉकयार्डचे काम ही सुरू आहे.बहुचर्चित नाणार प्रकल्पाचे काम ही या ठिकाणी प्रस्तवीत आहे.लोटे औद्योगिक वसाहतीचा होणारा विकास तसेच कोका-कोला कंपणीने सुमारे 500 कोटी रूपयांची केलेली गुंतवणुक यामुळे भविष्यात चिपळुन-कराड रेल्वेमार्ग होणे अपेक्षित होते.मात्र कराड-पाटणच्या लोकप्रतिनिधींनी बघ्याची भुमिका घेतल्याने कराड-चिपळुण रेल्वे मार्ग केवळ स्वप्नच राहाणार आसल्याचे दिसत आहे.या रेल्वे प्रकल्पासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 2011 साली आग्रही भुमिका घेतली होती हा रेल्वे मार्ग दळणवणासाठी तसेच कोकणच्या विकासासाठी जवळचा सुकर मार्ग आहे.यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता तर त्यासाठी केद्रीय अर्थसंकल्पात 366 कोटी रूपये निधीला मंजुरी ही देण्यात आली होती.मात्र कोल्हापुर-वैभववाडी या नव्या प्रकल्पामुळे सध्या तरी कराड-चिपळुण रेल्वे मार्ग मागे पडला आहे.

कोकण येथे नाणार रिफायनरी प्रकल्प साकारला जाणार आहे त्यासाठी महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे कोल्हापुर-वैभववाडी प्रकल्पाच्या प्रस्तावासाठी वारंवार मागणी करून आग्रह धरला होता त्यामुळे या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे.मात्र या मार्गाच्या आगोदर मंजुरी मिळुन ही चिपळुण-कराड रेल्वे मार्गाचे भवितव्य आधांतरी दिसते आहे.या रेल्वे मार्गासाठी लोकप्रतिनिधी मधुन उठाव होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्‍त होत आहेत .

वाहतुकीच्या दृष्टीने हे दोन्ही मार्ग गरजेचे आहेत.नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे वैभववाडी-कोल्हापुर मार्ग होणेसाठी भाजपा सरकारणे आट्टाहास धरला आहे.कराड-चिपळुन मार्ग पश्‍चिम महाराष्ट्रातील साखर उद्योगाला चालना देण्यासाठी प्रस्तावित होता या प्रकल्पाच्या एकुण खर्चाच्या निम्मा खर्च राज्य शासनाने करण्याचा होता.परंतु या सरकारणे या प्रकल्पा बाबत काय निर्णय घेतला आहे याची माहिती घेवुन लोकप्रतिनिधी म्हणुन या रेल्वे मार्गाचा मुद्दा उचलुन धरू.आमचे सरकार आल्यास कदाचित या प्रकल्पासाठी वेगळा निर्णय घेवु.
-पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री