कान्हरवाडीत बंद घरावर चोरट्यांचा डल्ला


वडूज : कान्हरवाडी ता. खटाव येथे दि. 3 रोजी बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. कान्हरवाडी येथे दि. 3 रोजी गावातील देवीची जत्रा होती.

त्या जत्रेत सुरेश येलमार हे रात्री 8 च्या सुमारास गेले होते. त्यानंतर ते रात्री साडे नऊच्या सुमारास घरी परतले. तेव्हा घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी घरात जात पाहणी केली. तेव्हा घरातील रोख रक्कम व चांदीचे दागिने असा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी सुरेश येलमार यांनी वडूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या चोरीचा तपास सहा. फौजदार दोलताडे करत आहेत.

No comments

Powered by Blogger.