आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

'व्हॉटसअॅप'ला इशारा भारतीय कायद्याचं पालन करा, नाहीतर....


नवी दिल्ली : सूचना आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांची व्हाट्सअॅपचे सीईओ क्रिस डेनियल्स यांनी दिल्लीत भेट घेतली. यावेळी रविशंकर प्रसाद यांनी भारतात व्हॉटसअॅपचं सर्वर बनवण्याविषयी डेनियल्स यांना सांगितलं.

भारतात व्हॉटसअॅपचं एक कॉर्पोरेट ऑफिस बनवा, म्हणजे तात्काळ तक्रार करता येईल. तसेच व्हॉटसअॅपने भारतीय कायद्याचं पालन नाही केलं, आणि वेळोवेळी उल्लंघन केलं, तर व्हॉटसवर गुन्ह्याला प्रोत्साहन दिल्याचा आरोप लागू शकतो, असं देखील रविशंकर प्रसाद यांनी सरकारच्या बाजूने बजावलं आहे.

याशिवाय व्हॉटसअॅप ट्रेनिंग प्रोग्राम देखील सुरू करणार आहे. रविशंकर प्रसाद यांनी क्रिसे डेनियल्सला घाण आणि दहशत पसरवणारे मेसेज सरकारसोबत शेअर करण्याचं सिस्टम असाव, म्हणजे माहिती मिळेल की हे मेसेज नेमके कुठून आणि कोण पसरवतंय. जो कोणता डाटा आहे, त्याचं लोकेशन भारतातच असावं, तसेच पेमेंट बँकसाठी आरबीआयचे जे नियम असतील ते पाळावे लागतील असं देखील रविशंकर प्रसाद यांनी व्हॉटसअॅपच्या सीईओला सांगितलं.प्रसाद यांनी असं देखील म्हटलं आहे की, व्हॉटसअॅपने देशभरात जागृकता निर्माण करण्याचं काम केलं आहे, पण मॉब लिंचिंग सारख्या घटनांमध्ये व्हॉटसअॅपचा दूरूपयोग देखील झाल्याचं त्यांनी सांगितलं.