महाबळेश्‍वरमधील तरुणावर पोक्‍सोअंतर्गत गुन्हा


महाबळेश्वर : पोलादपूर तालुक्‍यातील कोतवाल बुद्रुक येथे वास्तव्यास आलेल्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी महाबळेश्वर येथील साहिल माळवदे या तरुणावर पोलादपूर पोलीस ठाण्यात “पोक्‍सो’अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पीडित तरुणी महाबळेश्वर तालुक्‍यातील असून ती पोलादपूर तालुक्‍यातील कोतवाल बुद्रुक येथे नातेवाईकांकडे आली होती. या तरुणाने पीडितेला महाबळेश्वर येथील एका लॉजवर नेउन शाररिक संबंध ठेवल्याची फिर्याद पीडितेच्या आईने पोलादपूर पोलीस ठाण्यात दिली.

 पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीत साहिल माळवदे याने पीडितेस मंगळवारी (दि 21) रोजी सकाळी 11 वा. पोलादपूर बस स्थानक परिसरातून मोटारसायकल वरून महाबळेश्वर येथे नेले व एका लॉजमध्ये तिच्याशी (दि 22) सकाळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याबद्दल कोणास काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे या फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी संशयितावर भादवी 376, 506 व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्‍सो) 2012 च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा तपास पोलादपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल अंधेरी करीत आहेत.

No comments

Powered by Blogger.