विडणीत हरिनाम सप्हाताला विविध कार्यक्रम


विडणी : विडणी, ता. फलटण येथे श्री संत सावतामाळी महाराज पुण्यतिथीनिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहानिमिताने शनिवारी पहाटे काकडा भजन, श्रींची पूजा, ध्वजारोहन, पोथी पूजन, वीणापूजन, कलशपूजन करण्यात आले. यावेळी महात्मा फुले युवक संघटना यांच्या विद्यमाने श्री क्षेत्र अरणगाव येथून ज्योत आणण्यात आली तर रात्री दिलिप महाराज बनगडे यांचा किर्तनाचा कार्यक्रम झाला. रविवार, दि. 5 रोजी बाळासो पवार यांचा किर्तनाचा कार्यक्रम झाला. सोमवारी पोपटराव नाळे (सर) यांचे किर्तन झाले.

मंगळवार दि. 7 रोजी रात्री 9 वा. सतीश खोमणे यांचे किर्तन होणार असून हनुमान भजनी मंडळ, दहाबिघे किर्तनसाथ व हरीजागर करणार आहेत, बुधवारी रात्री 9 वाजता रामदास कदम, गोखळी यांचे किर्तन होणार आहे तर कदम-इंगळे भजनी मंडळ साथ देणार आहेत. गुरुवारी रात्री 9 वाजता ज्ञानेश्वर महाराज शिंदे, आंबवडेकर यांचे किर्तन असून त्यांना सावता व उत्तरेश्वर महिला भजनी मंडळ साथ देतील. शुक्रवारी सकाळी श्रींच्या समाधीवर पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होईल. दुपारी 3 वाजता श्रींची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तर 7 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार ओ. रात्री 10 ते 12 ज्ञानेश्वर महाराज शिंदे, आंबवडेकर यांचे काल्याचे किर्तन होवून सप्ताह समाप्त होणार आहे.

No comments

Powered by Blogger.