सातारा : सातारा शहरातील माची पेठेतील बांधकामावरील स्टिल कटींग करण्याची मशीन चोरीला गेले. याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.प्रमोद वासुदेव डोंगरे यांचे माची पेठेत एक बांधकाम सुरू आहे. त्या कामावरील साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी एक छोटीशी खोली बनवली होती.
त्या खोलीचा कडी व कोयंडा तोडत अज्ञात चोरट्याने स्टिल मशिन कट करण्याची मशिन चोरली. 15 हजार 500 रुपयाची मशिन चोरीला गेल्याची तक्रार डोंगरे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. या चोरीचा तपास हवा. जगदाळे करत आहेत.
Post a Comment