कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार
कोरेगाव : महसूल कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कामे करावीत, मी तुमच्या पाठीशी असून कोणी अडथळा निर्माण करत असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिला.

तहसीलदार स्मिता पवार आणि प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव येथील साई मंगल कार्यालयात महसूल दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी त्या बोलत होत्या. अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी जिल्हाधिकारी सचिन बारावकर, प्रांताधिकारी डॉ.स्वाती देशमुख, अस्मिता मोरे, हिम्मत खराडे यांच्यासह सर्व तहसीलदार श्‍वेता सिंघल म्हणाल्या, महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या अपवृत्तींना कायद्याच्या कक्षेत कडक शिक्षा होईल. यावर्षी सातारा जिल्ह्याने गौण खनिज व इतर बाबींमध्ये मोठ्या प्रमाणात महसूल जमा केला आहे, ही कौतुकाची बाब आहे. यामध्ये महसूल विभागातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा वाटा आहे.

यावेही उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते करण्यात आला. तणावमुक्त काम कसे करावे याबाबत यशदाचे प्रा. अशोक देशमुख यांनी यांनी मार्गदर्शन केले.

No comments

Powered by Blogger.