बॅंक एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्ष पदी अविनाश खलाटे


सातारा : बॅंक एम्प्लॉईज युनियन कोल्हापूरच्या 69 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील 3 वर्षासाठी 3 जिल्ह्याची कार्यकारिणी निवडण्यात आली. यात साताऱ्याच्या अविनाश खलाटे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी युनियनचे अध्यक्ष अतुल दिघे होते. यावेळी अन्य पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

या सभेत पुढील तीन वर्षासाठी तीन जिल्ह्याची कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष अतुल दिघे, जनरल सेक्रेटरी एन. एस. मिरजकर, ऑर्ग. सेक्रेटरी गोपाळ पाटील (सांगली), सेक्रेटरी प्रकाश जाधव, खजिनदार नाना पाटील. 3 उपाध्यक्ष दिलीप लोखंडे (कोल्हापूर), मुरलीधर कदम (सांगली), अविनाश खलाटे (सातारा). 3 जॉईंट सेक्रेटरी सुनिल वाखाडे (कोल्हापूर), संदीप पुराणिक (सांगली), किशोर निकम (सातारा) यांच्यासह 35 जणांची समिती नियुक्त करण्यात आली. या सभेला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील 200 सभासद हजर होते.

मागील सभेचे प्रोसिंडींग व अन्य ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. सांगली अर्बंनमध्ये करार करण्यात महत्वाची भूमिका घेतल्याबद्दल संजीव पुराणिक व सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे रावसाहेब आलारे यांना महाराष्ट्र सहकारी बॅंक असोसिएशनने आदर्श कर्मचारी पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. माजी उपाध्यक्ष व सातारा जिल्हा बॅंकेचे कामगार संचालक विक्रमसिंह शितोळे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.

अविनाश खलाटे (फलटण) यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा या बैठकीत आणि त्यानंतर फलटण येथे यथोचित सत्कार करण्यात आला.

No comments

Powered by Blogger.