म्हासुर्णेसह परिसरात कडकडीत बंद


म्हासुर्णे : मराठा समाजामार्फत आज पुसेसावळीतून विविध मागण्यांसाठी कडकडीत बंद पाळण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

आज सकाळपासूनच संपूर्ण बाजारपेठ व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणेच बंद ठेवली होती सकाळी नऊ वाजल्यापासून येथील चौकामध्ये मराठा समाज बांधव एकत्र येऊ लागले आणि साडे दहा वाजता एकत्र आलेल्या समाजबांधवांकडून शहरातील बाजार चौकातुन संपूर्ण शहरातून रॅली काढून आरक्षणाची मागणी केली, त्याचप्रमाणे पुसेसावळीसह चोराडे, गोरेगाव, राजाचे कुर्ले, म्हासुर्णे, शेनवडी, पारगाव, वडगाव उंचीठाणे या गावामध्ये बंद पाळण्यात आला होता.

No comments

Powered by Blogger.