मांढरदेव येथे बंद येथे उत्स्फूर्त प्रतिसाद


मांढरदेव :मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला गुरुवार जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाई तालुक्‍यातील मांढरगडावरही सर्व दुकानदारांनी स्वच्छेने सर्व दुकाने बंद ठेवली होती. यामुळे मांढरगडावर गुरुवारी दिवसभर शुकशुकाट होता.

मांढरदेव येथे दररोज भाविकांची वर्दळ असते. गुरुवारीही बंद असतानाही देवीच्या दर्शनासाठी भाविक येत होते. मात्र, सर्वच दुकाने बंद असल्यामुळे भाविकांची गैरसोय झाली. ओटी, नारळ, हार, प्रसाद तसेच पुजेचे साहित्यदेखील भाविकांना मिळाले नाही.

मांढरदेव येथील मराठा बांधवांनीही रस्तारोको करुन ठिय्या आंदोलन करुन मराठा आरक्षणाला विलंब करणाऱ्या सरकारचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी “एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.

No comments

Powered by Blogger.