जिल्ह्यातील धरणांमध्ये ८० टक्के पाणी


सातारा : सातारा जिल्ह्यात सध्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर कमी-अधिक होत असला तरी सर्वच धरणात पाणीसाठा समाधानकारक असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नदीपात्रासह धरणातील पाण्याच्या पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रमुख धरणे 80 टक्क्याच्यावर भरली असल्याने शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.पश्‍चिम भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत होत्या. सध्या पावसाचा जोर कमी-अधिक होत असून नदी, नाले, ओढे खळाळून वाहत आहेत. प्रमुख धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणातील पाणी पातळीत वाढ झाल्याने पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे.

कोयना धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 85.35 टीएमसी असून धरण 85.24 टक्के भरले आहे. गतवर्षी याच दिवशी 80.45 टक्के पाणी होते.धरणात 2349.69 द.ल.घ.मी पाण्याची आवक आहे. धोम धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 9.74 असून 83.32 टक्के धरणात पाणी आहे. गतवर्षी याच दिवशी 64.84 टक्के पाणी होते. धरणात 227.64 द.ल.घ.मी पाण्याची आवक आहे.

कण्हेर धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 7.99 असून 83.32 टक्के धरणात पाणी आहे. गतवर्षी याच दिवशी 88.32 टक्के पाणी होते .धरणात 207.80 द.ल.घ.मी पाण्याची आवक आहे. धोम बलकवडी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 3.43 असून 86.62 टक्के धरणात पाणी आहे. गतवर्षी याच दिवशी 87.12 टक्के पाणी होते. धरणात 100.92 द.ल.घ.मी पाण्याची आवक आहे.

उरमोडी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 8.32 असून 86.62 टक्के धरणात पाणी आहे. गतवर्षी याच दिवशी 89.33 टक्के पाणी होते. धरणात 152.92 द.ल.घ.मी पाण्याची आवक आहे. तारळी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा4.99 असून 85.45 टक्के धरणात पाणी आहे. गतवर्षी याच दिवशी 88.18 टक्के पाणी होते. धरणात 178.44 द.ल.घ.मी पाण्याची आवक आहे. नदीपात्रात 1590 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

मोरणा धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.86 असून 66.15टक्के धरणात पाणी आहे गतवर्षी याच दिवशी 63.85 टक्के पाणी होते.धरणात 112.87 द.ल.घ.मी पाण्याची आवक आहे तर सांडव्यावरून 1564 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.उत्तरमांड धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.58 असून 67.44 टक्के धरणात पाणी आहे गतवर्षी याच दिवशी 67.44 टक्के पाणी होते.

नागेवाडी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा0.10 असून 47.62 टक्के धरणात पाणी आहे गतवर्षी याच दिवशी 42.86 टक्के पाणी होते. महू धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठी 0.09 असून 8.26 टक्के पाणी आहे गतवर्षी याच दिवशी 12.84 टक्के पाणी होते. हातेघर धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.080 असून 32 टक्के धरणात पाणी आहे गतवर्षी याच दिवशी 32 टक्के पाणी होते.

No comments

Powered by Blogger.