कराचे पुनर्मूल्यांकन करा : सौरभ पाटील


कराड : कराड (जि. सातारा) येथील नागरिकांना नगरपालिका प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे संकलित कराची चुकीची वाढीव बिले आली आहेत. मुख्याधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केल्यानंतर त्यांनीही चूक मान्य करत अपील करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र अपील सुनावणीच्या माध्यमातून सर्वसामान्य कराडकरांवर अन्यायच होणार आहे. त्यामुळे १०० ते १५० किंबहुना त्याहून अधिक पटीने वाढवून दिलेली संकलित बिले मागे घेऊन प्रशासनाने नव्याने लोकांच्या मिळकतींचे मुल्यांकन करावे. 

सध्यस्थितीत कर आकारणीसाठी केलेली झोन पद्धत रद्ध करावी. तसेच विशेष सभा घेऊन कराच्या दराबाबत चर्चा व्हावी, अशी मागणी लोकशाही आघाडीचे गटनेते नगरसेवक सौरभ पाटील यांनी केली आहे.त्याचबरोबर अपील समिती हा विषय आम्हाला मान्य नसून पालिका प्रशासनाने आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास आंदोलन करावे लागेल. तसेच याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार दाखल करणार असल्याचे संकेत देत नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष तसेच मुख्याधिकाऱ्यांनाही निवेदन सादर केल्याचे सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे, मोहसीन आंबेकरी, माजी नगरसेवक सुहास पवार यांच्यासह शिवाजी पवार यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.