कऱ्हाडे ब्राम्हण संघाचा वर्धापनदिन साजरा


सातारा  : कऱ्हाडे ब्राम्हण संघाचा वर्धापन सोहळा बुधवार दि. 22 ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. यशवंत पाटणे तसेच कऱ्हाडे ब्राम्हण महासंघाचे सचिव गणेश गुर्जर यांची प्रमुख उपस्थिती होती.

गणेश वंदना व दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची मंगलमय सुरूवात झाली. संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब भाटे यांनी प्रास्ताविकात प्रमुख पाहूण्यांचा परिचय करून दिला तसेच संघाच्या कार्याचा आढावा घेतला. सातारा कऱ्हाडे ब्राम्हण संघाचे अध्यक्ष अनिलराव काटदरे यांनी प्रमुख अतिथींचा सत्कार केला. गणेश गुर्जर यांनी मनोगत व्यक्‍त करताना महासंघाच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती सभासदांना करून दिली.

पाटणे यांनी सुंदर जगण्यासाठी या विषयावर विचार व्यक्‍त करताना सांगितले की शारिरीक, मानसिक, अध्यात्मिक सुस्थिती म्हणजे उत्तम आरोग्य तसेच हेल्थ या शब्दाचा भावार्थ सांगितला. ते म्हणाले प्रेम हे आपल्या संस्कृतीचे पवित्र मुल्य आहे. संवादातील शब्दांना प्रेमाचा ओलावा लागला की जीवनालाच एक सुरेल सूर प्राप्त होतो. यावेळी त्यांनी सप्तसुरांचा सुंदर अर्थ विशद केला. कार्यक्रमात 10 व 12 वी च्या परीक्षेत उत्तम गुण संपादन केलेल्या कुटूंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळासाहेब भाटे यांनी केले. सुधीर करंबेळकर यांनी आभार मानले. शेंबेंकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. सौ. पराडकर यांनी पसायदान गायले. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments

Powered by Blogger.