विद्यार्थ्यांनी रोखल्या बसेस


गोखळी : राजाळे येथे एस.टी.बस थांबत नसल्यामुळे अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. अखेर संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी बसेस रोखल्या. यानंतर ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांची समजूत काढून याबाबत अधिकार्‍यांकडे निवेदन देवूया, असे सांगितल्यानंतर बसेस सोडण्यात आल्या.

फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील राजाळे येथील विद्यार्थी -विद्यार्थ्यांनी दररोज सकाळी फलटण येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी जात असतात. फलटण-आसू मार्गावरील आसू, गुणवरे, गोखळी येथून फलटणकडे जाणार्‍या बसेस जागेवरूनच भरून येत असल्याने राजाळे येथे थांबत नाहीत. यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात उशिरा पोहोचत असल्याने पहिल्या दोन तास बुडतात. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

याबाबत फलटण एस. टी. आगारातील संबंधीत अधिकारी यांना विनंती करण्यात येवूनही दखल घेतली नाही. यामुळे पूर्व भागातून येणारे बसेस राजाळे येथे विद्यार्थी -विद्यार्थ्यांनींनी आज मंगळवारी सकाळी सहा पासून रोखून धरल्या. यामुळे पूर्व भागातून पुढे फलटणकडे जाणारे महाविद्यालयीन विद्यार्थी अडकून पडले. राजाळे येथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांची समजूत घालून एस.बसेस सोडण्यास सांगितले एस टी आगारातील अधिकारी यांना भेटून तुमची होणारी अडचणबाबत त्यांना कल्पना देऊन राजाळे पर्यंत बस सुरू करावी, अशी पुन्हा एकदा सांगून बघून बघू असे सांगितले विद्यार्थ्यांनी रोखलेल्या चार एस. टी. बसेस बसेस लगेच सोडण्यात आल्या. सबंधीतांनी फलटणहून सकाळी सहा वाजता राजाळेपर्यंत बस सुरू करावी किंवा राजाळे मुक्कामी बस सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी ग्रामस्थाकडुन करण्यात येत आहे.

No comments

Powered by Blogger.