हनुमानगिरी हायस्कुलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश


पुसेगाव :पुसेगाव ता. खटाव येथील श्री हनुमानागिरी हायस्कुलच्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परिक्षेत यश संपादन केले आहे.

इयत्ता पाचवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत तनुजा महेश गुरव, सुदीप दिलीप शितोळे, धनश्री रवींद्र देशमुख, स्वरा विनोद पवार हे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. इयत्ता आठवी उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत सानिका राहुल जाधव, किरण यशवंत घुगरे, चैतन्प नवनाथ साखरे, जय भारत जाधव, संतोषी रोहिदास पवार हे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थांचे संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव डॉ. सुरेशराव जाधव, विश्वस्थ मोहन जाधव, सर्व संस्था पदाधिकारी तसेच प्राचार्य डी. पी. शिंदे, पर्यवेक्षक श्रीधर जाधव यांनी अभिनंदन केले.

No comments

Powered by Blogger.