Your Own Digital Platform

पाणी फाऊंडेशन मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल निमसोड ग्रा पं.चा सत्कार


मायणी : पाणी फाऊंडेशन मध्ये उत्कृष्ट काम करुन बहुमल्य योगदान दिल्या बद्दल निमसोड ता. खटाव येथील पाणी फाऊंडेशन टीमचा सत्कार करण्यात आला.

वडूज येथे आयोजित खास सत्कार समारंभात माजी कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, आ. शशिकांत शिंदे, माजी आ. प्रभाकर घार्गे, पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक आबा, तालुका समन्वयक जितेंद्र शिंदे -साबळे, खटाव पं.समितीचे सभापती संदीप मांडवे, गटविकास अधिकारी मेंढीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर सत्कार करण्यात आला.

 निमसोड ग्रामपंचायतीचे उपसरंपच संतोष देशमुख यांनी सदर सत्काराचा स्वीकार केला. सदर वेळी अमोल मोरे, निलेश मोरे, प्रशांत पोतदार, सुशांत देशमुख, गजानन सुतार, शरद अवघडे आदी निमसोडचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. पाणी फाऊंडेशन कामामधील ९६ हजार घनमीटर काम केल्याबद्दल हा सत्कार आयोजित करण्यात आला होता.