लाल बहाद्दूर शास्त्री महाविद्यालयातून जवानांसाठी पाठवल्या राख्या


सातारा : लाल बहाद्दूर शास्त्री महाविद्यालयाच्या तिसऱ्या मुल्यांकन कार्यासाठी डॉ. श्रीमती सुधाराणी पांडे, डॉ. अशोककुमार साहा, डॉ. निधाट बारोत यांची टीम आलेली होती. या टिमच्या हस्ते महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थीनींनी खाऊचे पैसे एकत्र करून सीमेवरती रक्षणासाठी उभ्या असलेल्या जवानांसाठी 2000 राख्या खरेदी केल्या व त्या नॅक टिमच्या हस्ते रवाना केल्या. त्याबद्दल नॅक टिमने विद्यार्थीनींनींचे कौतूक केले. गेली 25 वर्षापासून सुरू असलेली जवानांना राख्या पाठवण्याची परंपरा एनएसएसच्या विद्यार्थ्यीनींनी पुढे चालू ठेवली. जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करत आहेत. 

त्यामुळे आपण सुरक्षित आणि सारा देश सुरक्षित असल्याची भावना मुलींनी व्यक्‍त केली. जवान आपल्या कर्तव्यापासून किंचीतही ढळत नाहीत. त्यांना कर्तव्य बजावताना प्रेरणा मिळावी या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत जवानांसाठी राख्या पाठवल्या जातात. मा. प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांनी मुलींच्या या कृतीचे कौतुक केले. यासाठी प्रकल्प अधिकारी प्रा. एन. व्ही. शिंदे, प्रा. पी. आर जाधव, प्रा. टी. व्ही रूपनवर, व राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. मा. प्राचार्य शेजवळ यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments

Powered by Blogger.