मायणी व परिसरात कडकडीत बंद


मायणी : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आवाहनास मायणी व परिसरातील नागरिकांच्या वतीने कडकडीत बंद पाळून शासनाचा निषेध करण्यात आला.

मायणी येथे सकाळी ९ वांजता सकल मराठा बांधव एकत्र जमा झाल्यानंतर' आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, नागपूरचा पोपट काय म्हणतोय, मराठ्यांना आरक्षण नाय म्हणतोय आदी शासन विरोधी घोषणा देत संपूर्ण गावातून मोर्चा काढण्यात आला. मायणीतील सर्व दुकाने, शिक्षण संस्था, पेट्रोल पंप आदी बंद ठेवण्यात आली होती. दिवसभरात एकदेखील एस.टी. बस आली नव्हती. मोर्चातील काही युवकांनी मायणी ते वडूज हे तीस कि.मी. अंतर चालत जाऊन तहसीलदारांना निवेदन देऊन आले. मायणी पोलीस औटपोस्टचे सपोनि गोसावी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता सदर बंद शांततेत पार पडला.

दरम्यान मायणी परिसतील निमसोड,कलेढोण, चितळी, कातर खटाव, म्हासुर्णे , विखळे, पांचवड या गावांमध्येही कोणताही अनुचित प्रकार न घडता मोर्चे शांततेत पार पडले.

No comments

Powered by Blogger.